सर्व संस्थाचालकांना कळविण्यात येते कि, आपल्या ठाणे जिल्हा टंकलेखन, लघुलेखन, संगणक टंकलेखन शासनमान्य संस्थांची संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. 22 मे 2024 रोजी सकाळी 10.00 ते 2.00 वा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथील मिनी थिएटर, दुसरा मजला, ठाणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे विषय:
▪️२०२४ च्या नूतनीकरण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे.
▪️मार्केटिंग बाबत माहिती देणे.
▪️मे २०२४ मध्ये होणाऱ्या ऑनलाईन लघुलेखन परीक्षेबाबत मार्गदर्शन करणे.
▪️2024 ते 2028 साठी नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करणे.
आसन व भोजन व्यवस्था करण्याच्या दृष्टीने सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी सर्व संस्थांना रेझरपे लिंक द्वारे २० मे रोजी सायंकाळी ६ पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर नोंदणी करताना भरावयाचे शुल्क रुपये 50/- (प्रति व्यक्ती) हे संघटनेच्या संकेतस्थळावर "Register Now" लिंक द्वारे भरावेत. प्रति संस्था किमान 2 व्यक्ती उपस्थित राहू शकतात. नोंदणी शुल्क भरल्यानंतर आपल्या तालुका प्रतिनिधींना याबाबत सूचित करावे.
या सभेनंतर जिल्हा संघटनेतर्फे संस्थाचालकांना मोफत मार्केटिंगचे पोस्टर्स देण्यात येणार आहेत.
सर्व संस्थाचालकांनी आपली मागील वर्षांची बाकी असलेली तसेच 2024 ची वार्षिक वर्गणी भरणे बंधनकारक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आपल्या तालुका प्रतिनिधीशी संपर्क साधावा.
तरी सर्व संस्थाचालकांनी वेळेवर या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित रहावे ही नम्र विनंती. सभेच्या ठिकाणी सशुल्क पार्किंग सेवा उपलब्ध आहे.
सरचिटणीस
ठाणे जिल्हा संघटना
TDCEIA